Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याचोपड्यात आढळले कोरोनाचे दोन महिला रूग्ण

चोपड्यात आढळले कोरोनाचे दोन महिला रूग्ण

दोन्ही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याचे जाहीर

चोपडा/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- चोपडा तालुक्यामध्ये कोरोनाचे दोन रूग्ण आढळून आले आहेत. प्रशासनाच्या वतीने या दोन्ही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याचे जाहीर केले आहे.

देशात कोविड-१९ या विषाणूचा जे-१ हा व्हेरियंट सर्व भागात मोठ्या प्रमाणामध्ये पसरत असल्याचे दिसून आले आहे. जळगावमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाचा पहिला रुग्ण भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथे आढळून आला होता. तो आता बरा झाल्याने रूग्णाला घरी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे.

आताच मिळालेल्या माहिती नुसार, चोपडा येथील दोन महिलांना कोरोनाचा संसर्ग आढळून आला आहे. चोपडा येथील उपजिल्हा रूग्णालयात विलगीकरण करून या दोन्ही महिलांवर उपचार करण्यात येत आहे.

  1. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने या दोन्ही महिलांना सौम्य लक्षणे असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच कोविडच्या संसर्गाबाबत सतर्कता बाळगा या संसर्गाला घाबरून न जाता.लक्षणे दिसताच उपचार घावेत. या कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका असेही प्रशासनाचा वतीने आवाहन करण्यात आलेले आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या