मुंबई- सीआयडी’ या लोकप्रिय शोमध्ये फ्रेडरिकची भूमिका साकारणारे दिनेश फडणीस हे गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची आजाराशी झुंज आपल्याशी ठरली. काळ रात्री म्हणजेच ४ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले आहे. १ डिसेंबरच्या रात्री त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना मुंबईतील तुंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.आज ५ डिसेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत.
सीआयडी या प्रचलित शो ची संपूर्ण स्टारकास्ट त्यांच्या निवासस्थानी पोहोचली आहे. दिनेश फडणीस यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. चाहते आणि कलाकार पोस्ट शेयर करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
दिनेश फडणीस यांनी ‘सीआयडी’मध्ये अनेक वर्षे काम केले. १९९८ ते २०१८ पर्यंत त्यांनी फ्रेडरिकची भूमिका साकारली. याशिवाय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्येही ते छोट्या भूमिकेत दिसले होती. शोमधील त्यांची फनी स्टाइल सर्वांनाच आवडली. इतकंच नाही तर सीआयडी व्यतिरिक्त दिनेश यांनी अदालत, सीआयडी स्पेशल ब्युरो, ट्रॅक मेहता का उल्टा चष्मा या मालिकांमध्ये सुद्धा अभिनय केला आहे. याशिवाय ते आमिर खानच्या चित्रपट ‘सरफरोश’ आणि हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’मध्येही दिसला आहे.