Sunday, July 13, 2025
police dakshta logo
Homeजळगावगुन्हा दाखल करण्यास विलंब; तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक अडचणीत

गुन्हा दाखल करण्यास विलंब; तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक अडचणीत

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- सीएसआर फंडातून शेततळ्याचे काम मिळवून देतो असे आमिष दाखवून ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्याने रामानंदनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे आणि आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सुदाम काकडे अडचणीत आले आहेत. या प्रकरणी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबईने दोघांनाही खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शेततळे कामाच्या कंत्राटासाठी चंदिगड व मुंबई येथे बोलावून अजय बढे यांची फसवणूक झाल्याचा आरोप निवृत्त अभियंता व्ही.डी. पाटील, कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन व सहकाऱ्यांवर आहे. अजय बढे यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. चौकशीचे आदेश देऊनही गुन्हा दाखल करण्यात उशीर झाला.

न्यायालयाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतरही रामानंदनगर पोलिसांनी दिरंगाई केली. आरोपींच्या बचावासाठी चौकशीचा अहवाल सादर केल्याचा आरोप उपनिरीक्षक सुदाम काकडे यांच्यावर आहे. त्यामुळे अजय बढे यांनी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारीची दखल घेत प्रकरण राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबईकडे वर्ग करण्यात आले असून राजेंद्र कुटे व सुदाम काकडे यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, संशयित आरोपींना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला असून पुढील सुनावणीसाठी अजय बढे २४ जून रोजी आपले म्हणणे मांडणार आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या