Monday, September 16, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याक्षमतेपेक्षा जास्तीचा लोड वाहून नेणाऱ्या डंपर मधून काळी माती रस्त्यावर पडून अपघात...

क्षमतेपेक्षा जास्तीचा लोड वाहून नेणाऱ्या डंपर मधून काळी माती रस्त्यावर पडून अपघात…

नशिराबाद/ मुख्य संपादक चंदन पाटील/ पोलीस दक्षता लाईव्ह:- भागपूर येथे सुरू असलेल्या धरणाच्या कामासाठी लागणाऱ्या कळ्या मातीची वाहतूक करणाऱ्या डंपर मुळे गेल्या काही दिवसांपासून ग्रामस्थांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अपघात घडत आहेत. असाच अपघात आज रोजी घडला. यात मोटर सायकल स्वार जखमी झाला आहे. त्याला तत्काळ दवाखान्यात हलविले असून उपचार सुरू आहेत

या वाहनांवर कोठेही आणि कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही.

सविस्तर वृत्त असे की, भागपुर धरणाच्या कामासाठी लागणाऱ्या काळ्या मातीचा क्षमतेपेक्षा जास्तीचा लोड वाहनातून वाहिला जात असून या कडे प्रशासन डोळे झाक करीत आहे. डंपर मधून काळी माती रस्त्याने वाहन चालकांच्या अंगावर तसेच डोळ्यात जाण्याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. क्षमतेपेक्षा जास्ती भरलेल्या डंपर मधून काळी माती रत्यावर पडून अपघात होत आहे. भरलेले अवजड डंपर सुसाट वेगाने पळविली जात असून ग्रामस्थांना रस्त्याने ये जा करणेही कठीण झाले आहे. या डंपरची लोड क्षमता चेक करून यांचेवर कारवाई होणेची मागणी जोर धरीत आहे  विशेष करून हे वाहन मुक्ताईनगर येथून भरून येत असल्याची माहिती मिळत आहे. तरी या वाहनांवर कोठेही आणि कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

धरण प्रशासन व पोलीस घटनास्थळी दाखल.

नशिराबाद येथील उमाळा रस्त्यावरील पेठ भागाजवळ असाच एक मोठा खड्डा पडल्यामुळे तेथे गेल्या काही दिवसापासून अपघात घडत असून त्यात नशिराबाद नगरपंचायतीची पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन फुटल्या कारणाने रस्ता चिखलमय झालेला असून, या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे.या डंपर मधून खाली पडलेल्या काळ्या मातीमुळे, आणि पाण्यामुळे आज रोजी या ठिकाणी नशिराबाद पेठ येथील जितेंद्र ज्ञानदेव पाटील यांची मोटर सायकल स्लिप होऊन त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. जळगाव येथील दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे तिथे जमलेल्या संतप्त नागरिकांनी धरणावर जाणारे सर्व डंपर रस्त्यावर थांबवलेले असून तेथे धरणावरील अध्यापक साहेब तसेच वडर साहेब यांना बोलवण्यात आले. घटनास्थळी पोलीसही दाखल झाले होते.

रस्त्याची दुरुस्तीची हमी धरण प्रशासनाने घ्यावी अशी नागरिकांची मागणी.

अपघात स्तळी संतप्त नागरिकांनी वाहन अडविल्यामुळे धरण प्रशासनाने याची दखल घेत रस्त्याचे डागडुजी करण्यास सुरुवात केली असून, तिथे जेसीबी बोलवून पाईप लाईन जोडण्याचे काम सुरू होते. तसेच रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजवीण्याचे काम सुरू होते. काम सुरू असताना ग्रामस्थ तेथे तळ ठोकून होते. गेल्याच वर्षी हा रस्ता डांबरीकरण झाला होता या अवजड डंपर वाहतुकीमुळे या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. तरी धरण प्रशासनाने या कडे लक्ष देऊन जो पर्यंत धरणाचे काम सुरू आहे तो पर्यंत या रस्त्याची दुरुस्तीची हमी घ्यावी अशी नागरिकांची मागणी आंहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या