Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeजळगावधक्कादायक! विनयभंग प्रकरणात आईची आरोपीला साथ; दोघांविरोधात गुन्हा दाखल

धक्कादायक! विनयभंग प्रकरणात आईची आरोपीला साथ; दोघांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- शहरातील भोईटे नगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वारंवार विनयभंग करण्यात आला असून, या कृत्यात पीडित मुलीच्या आईनेच आरोपीला साथ दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी मयूर रमेश शिंपी (रा.कांचन नगर) आणि पीडितेच्या आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारंवार छळ, तरीही आईची भूमिका संशयास्पद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता आरोपी मयूर शिंपी पीडितेच्या घरी आला असता त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य करून विनयभंग केला. याबाबत तिने आपल्या आईला सांगितले असता, तिने तक्रार करण्याऐवजी ‘उगाच काही सांगू नकोस’ असे म्हणून दुर्लक्ष करण्यास सांगितले.

२८ फेब्रुवारी आणि १२ जून रोजीदेखील तसाच प्रकार
यानंतरही दोनदा आरोपीने अश्लील वर्तन केले. पीडितेने विरोध केला तरी तिची आई आरोपीच्या बाजूने उभी राहत होती. अखेर पीडित मुलीने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

गुन्हा दाखल, तपास सुरू
या तक्रारीवरून मयूर शिंपी आणि मुलीच्या आईविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर करत आहेत.

घटनेमुळे संतापाची लाट
आईने आपल्या मुलीच्या सुरक्षेपेक्षा आरोपीला पाठीशी घालणे हा प्रकार समाजमन हादरवणारा असून, या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या