Friday, November 22, 2024
police dakshta logo
Homeमहाराष्ट्रधनगर आरक्षणाबाबत क्रांती शौर्यसेना अध्यक्ष वाघमोडे यांचा दौरा

धनगर आरक्षणाबाबत क्रांती शौर्यसेना अध्यक्ष वाघमोडे यांचा दौरा

समाजबांधवांशी आंदोलनाबाबत केली चर्चा

चांदवड/जि .नाशिक/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- अहिल्यादेवी महिला विकास प्रतिष्ठान प्रेरित क्रांती शौर्यसेना अध्यक्ष कल्याणी वाघमोडे व धनगर समाजबांधव यांनी समाजाच्या विविध मागण्यांसाठी डिसेंबर महिन्यात दिल्लीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.त्यांनी निवेदनात नमूद केले आहे की ,धनगर समाजाला एक महिन्याच्या आत अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी 30 ऑक्टोबर ला आझाद मैदान मुंबई आणि डिसेंबर महिन्यात दिल्ली येथे समाजातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.गेली 75 वर्षे धनगर समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.त्यांनी नमूद केले आहे की, राष्ट्रपतींनी अनुसूचित केलेल्या 1 ते 47 क्रमांकात 36 नंबरला धनगर जमातीचा समावेश आहे. परंतू कोणत्याच सरकारला धनगर आरक्षणाचे भिजत घोंगडे सोडविता आलेले नाही.

धनगर समाजाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चे आंदोलन करून निवेदने देण्यात आली आहेत.परंतू सरकारने गांभीर्याने दखल घेतली नाही.मागील सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीआयएसएस’ चा अहवाल धनगर समाजाच्या माथी मारत वेळकाढू धोरण राबविले आहे.
त्यांनी सरकारकडे केलेल्या आणखी काही मागण्यांमध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी.मेंढपाळसाठी संरक्षण व राखीव चराई क्षेत्र ,विमा उपलब्ध करावे, आरक्षण आंदोलनातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे, धनगर समाजाला न्याय द्यावा. 25 ऑक्टोबर पर्यंत राज्यसरकारने केंद्र सरकारला अहवाल पाठवावा अन्यथा 30 ऑक्टोबर रोजी आझाद मैदान मुंबई व 7 ते 11 डिसेंबर 2023 दरम्यान दिल्ली जंतरमंतर येथे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी डॉ. मनोज पगारे, तुकाराम गाढे, बापू मोरे, जालिंदर मोरे, भगवान बडे, पप्पू बडे, निलेश मोरे, बाळू बस्ते, म्हाळू जाधव, शंकर मोरे, रमेश पानसरे, गणेश नाकोडे आदींसह समाजबांधव उपस्थित होते. यातच कल्यानी वाघमोडे ह्या चांदवड येथे दौऱ्यावर आले असताना चन्द्रेश्वर पायथा भागात एक कांदळकर नामक मेंढपाळवर अज्ञातांनी हल्ला केल्याने चांदवड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मेंढपाळांवर होणारे हल्ले हा गंभीर विषय आहे. याबाबत सरकारने लक्ष घालावे असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या