Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमधरणगाव तालुक्यात भीषण अपघात : रील बनवताना दोन तरुणांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू.

धरणगाव तालुक्यात भीषण अपघात : रील बनवताना दोन तरुणांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू.

प्रसिद्धीच्या हव्यासाचा जीवघेणा शेवट ; रिलने घेतला दोघांचा जीव…परिसरात हळहळ.

धरणगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह : – मोबाईलवर व्हिडिओ (रील) बनवण्याचा अतिरेक आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीची हाव दोन शाळकरी मित्रांसाठी जीवघेणी ठरली आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी-चांदसर रेल्वे गेटजवळ  दि. २५ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत तरुणांची नावे प्रशांत पवन खैरनार (वय १८) आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे (वय १८) अशी आहेत. दोघेही पाळधी येथील महात्मा फुले नगर, प्लॉट भागातील रहिवासी होते. दोघेही अत्यंत मनमिळाऊ, हसतमुख स्वभावाचे म्हणून परिसरात परिचित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारची सुट्टी असल्याने हे दोघे मित्र रेल्वे ट्रॅकवर ‘रील’ बनवण्यासाठी गेले होते. मोबाईलवरील लोकप्रिय ॲपसाठी अधिक धोकादायक आणि आकर्षक व्हिडिओ तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतानाच, धरणगावकडून जळगावकडे जाणाऱ्या अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. रेल्वेच्या वेगामुळे अपघात इतका भीषण झाला की दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही क्षणांतच परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळविले. पाळधी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा प्रक्रिया हाती घेतली. दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या