Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमदुधात भेसळ करणाऱ्या इसमावर धरणगावात कारवाई ; सुमारे ७६ लिटर अपायकारक मिश्रण...

दुधात भेसळ करणाऱ्या इसमावर धरणगावात कारवाई ; सुमारे ७६ लिटर अपायकारक मिश्रण जप्त

धरणगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- (भवरखेडा) स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव आणि धरणगाव पोलीसांनी भवरखेडा येथे संयुक्त कारवाई करत एका इसमाच्या घरी छापा टाकून दुधात भेसळ करणारा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईत सुमारे ७६ लिटर अपायकारक द्रव व इतर भेसळ साहित्य जप्त करण्यात आले असून, सोमनाथ आनंदा माळी (वय ३१, रा. भवरखेडा, ता. धरणगाव) या इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील (स्थानीय गुन्हे शाखा, जळगाव) यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, भवरखेडा येथील आरोपी आपल्या राहत्या घरी दुधात पामतेल, पावडर व अन्य रसायने मिसळून ते विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे श्री. किशोर आत्माराम साळुंखे यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. या छाप्यात ३८ लिटर भेसळयुक्त दूध, ३८ लिटर भेसळ मिश्रण, १.६ किलो रिफाइंड पाम तेल, ४.५ किलो ‘स्प्रे प्राईड’ पावडर इत्यादी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशांक नखाते व श्रीमती कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात पो.उपनिरीक्षक जितेंद्र वल्हे, संतोष पवार, पो.हे.कॉ. विष्णू बिन्हाड, दिपक माळी, रविंद्र पाटील, विलेश सोनवणे, व महिला पो.हे.कॉ. वर्षा गायकवाड यांचा समावेश होता.

आरोपीविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास धरणगाव पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या