धुळे | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह:- धुळ्यात संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात विविध ठिकाणी सकल भागात पाणी साचल्याचे बघावयास मिळाले आहे, तर पोलीस अधीक्षक कार्यालया बाहेर देखील गुडघाभर पाणी साचल्याचे दिसून आले आहे.
धुळे शहरात संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि या जोरदार झालेल्या पावसानंतर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर अक्षरशः जलमय परिस्थिती झाल्याचे दिसून आले आहे, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, त्याचबरोबर नागरिकांना देखील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पोहोचताना गुडघ्याभर पाण्यामधून जावे लागले आहे.