धुळे / प्रतिनिधी /पोलिस दक्षता लाईव्ह :- संजीवनी युवा प्रतिष्ठान संस्थेमार्फत एक राखी जवानों के नाम या उपक्रमांतर्गत सैनिकांना एक लाख राख्या देण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने धुळे शहरात प्रतिष्ठान मार्फत आलेल्या रक्षारथ धुळे येथील महाजन हायस्कूल येथे आला असता त्या ठिकाणी शिवसेना राज्य उपनेते तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी पाटील यांनी भेट देत जवानांसाठी राख्या सुपूर्द केल्या.
याप्रसंगी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे महाजन हायस्कूल धुळे तसेच महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महाजन हायस्कूलचे प्राचार्य पद्मर सर व शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी जवानांसाठी राख्या भेट दिल्या. शुभांगी पाटील यांनी प्रतिष्ठानच्या कार्यास यावेळी शुभेच्छा दिल्या..