Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमशिक्षणाधिकारी व वरिष्ठ सहाय्यक लाच प्रकरण

शिक्षणाधिकारी व वरिष्ठ सहाय्यक लाच प्रकरण

धुळे/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- धुळे जिल्हापरिषदेचे शिक्षणाधिकारी राकेश साळुंके व वरिष्ठ सहाय्यक विजय पाटील यांना शिक्षक बदली प्रकरणात धुळे एसीबी पथकाने लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, वरिष्ठ सहाय्यक विजय पाटील यांच्या मध्यस्थीने शिक्षकाचे बदलीचे प्रकरण शिक्षणाधिकारी यांच्या समोर आल्या नंतर शिक्षकाला या दोघांकडून लाच मागण्यात आली होती. या बाबत शिक्षकाने एसीबीकडे नोंदविलेल्या तक्रारी वरून धुळे एसीबी ने सापळा रचत कारवाई केली. या सापळ्यात काल दि.२६ आक्टोबर गुरुवार रोजी चार वाजेच्या सुमारास शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या दालनात धुळे एसीबी पथकाने लाच घेताना शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे व वरिष्ठ सहाय्यक विजय पाटील यांना रंगेहाथ अटक केली आहे. सदरची कारवाई धुळे एसीबी चे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या