धुळे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मुंबई आग्रा महामार्गावर कार व कंटेनर यांच्यामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले आहेत.आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.या अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता. अपघातातील मयत हे नाशिककडून धुळे येथे चालले होते, ते धुळे जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.या अपघातामध्ये धुळ्याचे भाजपचे नगरसेवक किरण आहिरराव यांचाही जागीत मृत्यू झाला आहे. कार नाशिककडून धुळ्याकडे जात असताना हा भीषण अपघात झाला आहे.हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भाजप नगरसेवक किरण आहिरराव यांच्या अपघाती मृत्यूमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
भीषण अपघाघातात धुळे येथील भाजपच्या नगरसेवकासह 4 जणांचा जागीच मृत्यू
RELATED ARTICLES