Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याधुळ्यात वाढीव बांधकामास मंजुरीसाठी लाच घेणाऱ्या अभियंतास एसीबीने पकडले

धुळ्यात वाढीव बांधकामास मंजुरीसाठी लाच घेणाऱ्या अभियंतास एसीबीने पकडले

धुळे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- वाढीव बांधकामास मंजुरी मिळवून देण्यासाठी २५ हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका खासगी बांधकाम सल्लागार अभियंत्याला धुळ्यात रंगेहात पकडले.

धुळे येथील औद्योगिक वसाहतीत वाढीव बांधकामास मंजुरी मिळवून देण्यासाठी लाच घेण्याचा प्रकार घडला. धुळे तालुक्यातील अवधान औद्योगिक वसाहतीत एका व्यक्तीला वाढीव बांधकाम करावयाचे होते. यासाठी त्याने औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे प्रकरण दिले होते. परंतू, कार्यवाही होत नव्हती. अहमद अन्सारी (३२, रा.इस्लामपुरा, धुळे) या खासगी बांधकाम सल्लागार तथा अभियंत्याने संबंधित अधिकाऱ्यांवर आपला प्रभाव टाकून हे प्रलंबित काम मार्गी लावून देण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तक्रारीच्या आधारावर प्राथमिक खात्री करुन विभागाने सापळा रचला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या