Friday, November 22, 2024
police dakshta logo
Homeजळगावअमळनेरचे प्रदिप पाटील यांना राज्यस्तरीय डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार...

अमळनेरचे प्रदिप पाटील यांना राज्यस्तरीय डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार जाहीर

अमळनेर/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:-भारताचे माजी राष्ट्रपती ,भारतरत्न , मिसाईल मेन ,डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या ९२ व्या जयंती निमित्त ड्रीम फाऊंडेशन , करुणा ग्रंथवाचक मंडळ व अनुप्रास बहुउद्देशीय शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा राज्यस्तरीय डॉ.कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार २०२३ जाहीर झाले आहेत. अमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रदिप गोकुळ पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.मागील अनेक वर्षापासून शैक्षणिक , सामाजिक ,युवा जागृती ,आधुनिक शेती पर्यावरण व साक्षरता यासह राष्ट्रीय मूल्य लोकांमध्ये रुजविण्यासाठी कार्य करीत आहेत . त्यांच्या या विधायक कार्याची दखल घेऊन निवड समितीने त्यांची राज्यस्तरीय गौरवासाठी निवड केली आहे.

रविवार दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी डॉ.अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी सकाळी ११ वा. छत्रपती संभाजी नगर येथे वाणी कम्युनिटी हॉल , शिवाजी चौक , शिवाजी नगर ,गारखेडा येथे अशोक नगरकर – वरिष्ठ वैज्ञानिक ,पुणे , ( डॉ.अब्दुल कलाम सरांसोबत काम केलेले ) डी.आर.डी.ओ.राजेंद्र वाणी सामाजिक कार्यकर्ते ,अजाबराव मनकर शिक्षण तज्ञ , अंकिता देखील ,युवा शास्त्रज्ञ, शिवाजी वालेकर यशोदिप करीयर अकॉडेमी , काशिनाथ भतगुणकी लेखक आणि प्रेरक वक्ते ( डॉ.अब्दुल कलाम सरांची भेट घेऊन व्हिजनसाठी संपूर्ण भारतभर सायकल प्रवास करणारे ) यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यात सन्मानचिन्ह , सन्मानपत्र , श्रीफळ मानाचा फेटा आणि डॉ.अब्दुल कलाम यांची ग्रंथे देऊन प्रदिप गोकुळ पाटील (विद्यार्थी )पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर यांचा गौरव करण्यात येणार आहे. सहपरिवार ,सह शिक्षकवृंद उपस्थित राहून पुरस्कार स्विकारण्याचे आवाहन ड्रीम फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या