भुसावळ | जीवन वारके | पोलीस दक्षात लाईव्ह :- भुसावळ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. श्री संजय भाऊ सावकारे यांच्याविषयी सोशल मिडिया अथवा अन्य माध्यमातून अपमानास्पद आणि गलिच्छ भाषेचा वापर करणाऱ्या एका व्यक्ती विरोधात भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी भुसावळ ग्रामीण (पश्चिम) तालुका यांच्या वतीने करण्यात आली.
या घटनेचा निषेध करत भाजपा पदाधिकारी व विविध समाजबांधव मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात उपस्थित होते. यावेळी संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. भाजप पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, या प्रकारामुळे समाजातील शांतता भंग होण्याचा धोका असून, जनभावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे दोषींवर तत्काळ गुन्हा दाखल करून कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या निवेदन प्रसंगी भाजपा भुसावळ ग्रामीण (पश्चिम) तालुक्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजातील विविध घटकांचे नागरिक उपस्थित होते.