Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगावडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे भडगाव येथील महिलेच्या गर्भातील अर्भकाचा मृत्यू

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे भडगाव येथील महिलेच्या गर्भातील अर्भकाचा मृत्यू

पाचोरा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- पाचोरा शहरातील एका प्रथीतयश डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भातील अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून होत असल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करायचा अथवा नाही याबाबत खल सुरु आहे.पाचोरा शहरातून भडगावच्या दिशेने जाणा- या रस्त्यावरील एका प्रथीतयश बड्या दवाखान्यात हा प्रकार रात्री घडल्याचे म्हटले जात आहे.

आदिवासी समाजातील भडगाव येथील एक महिला रुग्ण प्रसुतीसाठी या दवाखान्यात दाखल झाली होती. दुपारी दाखल झालेल्या गर्भवती महिलेचे रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास सिझर करण्यात आले. मात्र उशीरा ऑपरेशन टेबलवर घेण्यासह हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. मृतावस्थेतील अर्भकास सरकारी दवाखान्यात घेऊन जा.. असा सल्ला डॉक्टरांनी नातेवाईकांना दिला असल्याचे सांगितले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या