धरणगाव /प्रतिनिधी – धरणगाव येथील डॉ. हेडगेवार यांच्या नावाने देशातील एकमेव नगर ग्रामपंचायत येथे खासदार निधीतून सुमारे ३० लाखाचे सभामंडपाचे विधिवत भूमिपूजन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.आर.एन.महाजन होते. तर बाळासाहेब चौधरी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.याप्रसंगी भाजपाचे जेष्ठ नेते सुभाषआण्णा पाटील,राष्ट्रवादीचे मोहन पाटील सर, सरपंच सविताताई सोनवणे, डॉ. हेडगेवारनगर बहुउद्देशीय सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनिल वाणी होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन धनराज सोनवणे यांनी केले ,प्रास्ताविक भाजपाचे तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील तर आभार उपसरपंच चंदन पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला भाजपा शहराध्यक्ष दिलीप महाजन यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी ,डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतचे सदस्य,शाम पाटील, संभाजी सोनवणे,श्रीमती मंगला महाजन, शिला देशमाने,स्वाती चौधरी,शितल पवार उपस्थित होते. तसेच डाॅ. हेडगेवार नगर बहुउद्देशीय सेवा मंडळाचे सर्व सदस्य आणि परिसरातील ग्रामस्थ बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.