Sunday, February 2, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याभारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन..

भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन..

नवी दिल्ली वृत्तसंस्था :- भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे गुरुवारी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. प्रकृती खालावल्याने गुरुवारी संध्याकाळी त्यांना गंभीर अवस्थेत दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 2004 ते 2014 ते भारताचे पंतप्रधान होते. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यांनंतर आणि गांधी परिवाराचे नसलेले ते दीर्घकाळ पंतप्रधान होते.

1991 साली सिंग यांनी ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला.

1991 साली देशावर आर्थिक संकट आलं होतं, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी त्यांच्याकडे अर्थमंत्रिपदाची जबाबदारी दिली होती. 1991 साली सिंगयांनी ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला आणि देशावरचे आर्थिक संकट दूर केले.

1982 ते 1985 दरम्यान ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते.

मनमोहन सिंग यांच जन्म 26 सप्टेंबर 1932 साली पश्चिम पंजाबच्या गहमध्ये झाला. फाळणीनंतर सिंग यांचे कुटुंब भारतात आले. खुप लहान असताना सिंग यांच्या आईचे निधन झाले. सिंग यांचे पालनपोषण आजीने केले. 1952 साली सिंग यांनी भारतात अर्थशास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेतले. इंडियाज एक्सपोर्ट कॉम्पिटेटिव्हनेस विषयातून त्यांनी ऑक्सफोर्डमधून पीएचडी मिळवली. 1982 ते 1985 दरम्यान ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते.

2004 नंतर 2009 दुसऱ्यांदा पंतप्रधान.

2004 साली काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर मनमोहन सिंग हे पहिल्यांदा पंतप्रधान झाले. पुढे 2009 ला काँग्रेसला पुन्हा सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. त्यांच्या काळात मनरेगा, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार सारखे कायदे पारित झाले.
2016 साली मोदी सरकारने नोटबंदी केली. तेव्हा नोटबंदी म्हणजे सामूहिक लूट आहे अशा शब्दांत सिंग यांनी राज्यसभेट टीका केली होती.

1998 ते 2004 पर्यंत विरोधी पक्ष नेते पदावर.

सिंग यांनी 1999 सा लोकसभा निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. सिंग हे सातत्याने राज्यसभेवर निवडून येत होते. 1998 ते 2004 पर्यंत अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार होते, तेव्हा सिंग हे विरोधी पक्षनेते होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या