Sunday, September 8, 2024
police dakshta logo
Homeमहाराष्ट्रस्व. डॉ .पदवाड यांनी वैद्यकीय क्षेत्रात सात्विकता जपली... ज्येष्ठ समाजसुधारक ह भ...

स्व. डॉ .पदवाड यांनी वैद्यकीय क्षेत्रात सात्विकता जपली… ज्येष्ठ समाजसुधारक ह भ प डॉ रविंद्र भोळे.

पुणे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-  स्व.डॉ. एमपी पदवाड यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन वतीने उरुळी कांचन येथील राम मंदिरात करण्यात आले होते. या वेळी डॉ. रवींद्र भोळे यांनी श्रद्धांजली सभेमध्ये मत करतांना व्यक्तस्वर्गीय डॉ मधुकर पुंडलिक पदवाड महान रामभक्त होते. श्रीराम सहस्रनामावली प्राचीन दुर्मिळ अशा ग्रंथाच्या जुन्या प्रतीचे प्रकाशन त्यांनी श्रीराम मंदिर देवस्थान अंजनसिंगी अमरावती येथील राम मंदिरात केले. त्यांनी जीवनभर सात्विक कर्मे केली. वैद्यकीय क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करून निष्काम कर्मयोग साधला. मराठवाडा भूकंप , गॅस्ट्रोसाथ तसेच प्रायमरी हेल्थ सेंटर उरुळी कांचन रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून रुग्णसेवा केली. स्नेह प्रतिष्ठानच्या माध्यमातून ॲम्बुलन्स सेवा ही दिलेली आहे. वैद्यकीय सेवा एक व्रत अंगीकारून तीन ते चार दशके जीवनातील बहुमूल्य वेळ, शक्ती व साधनाद्वारे निरंतर समर्पितपणे वैद्यकीय सेवा केली. त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ही त्यांचा सहभाग असायचा. स्वर्गीय डॉ. एम पी पदवाड यांनी गीतेतील दहाव्या अध्यायातील आठव्या श्लोकाप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या मोक्ष प्राप्तीच्या सर्व अटी पूर्ण केल्यात.स्व डॉ पदवाड ह्यांनी वैद्यकीय क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करून सात्विकता जपून निष्काम कर्मयोग साधला,असे मत ज्येष्ठ समाज सुधारक प्रवचनकार ह भ प डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले.

याप्रसंगी व्यासपीठावर देविदासजी भन्साळी, निसर्गोपचार आश्रम चे विश्वस्त माऊली नाना कांचन, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे संस्थापक डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन, डॉ.रवींद्र अष्टेकर, डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन चे कार्यकारी अध्यक्ष डॉ संतोष राठोड, संजय मधुकर पदवाड, डॉ.सूचीस्मिता वनारसे सचिव, डॉ प्रशांत गोडसे, डॉ. बी .एल पाटील, डॉ समिर नानावरे उपस्थित होते.

याप्रसंगी आपले श्रद्धांजली सभेमध्ये आपले मत व्यक्त करताना देविदास भन्साळी म्हणाले की डॉ. एम पी पदवाड यांनी दुर्गम भागामध्ये वैद्यकीय सेवा दिलेली आहे. पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई यांच्या सल्ल्यानुसार उरुळी कांचन च्या दहा डॉक्टरच्या टीम द्वारे मराठवाडा भूकंपात त्यांनी कार्य केलेले आहे. सदा हसतमुख चेहरा या परिसरामध्ये परत दिसणार नाही. डॉ. एम.पी पदवाड यांच्या स्मृती दीपस्तंभासारख्या परिसरात तेवत राहतील. डॉ. रवींद्र अष्टेकर यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन सांगितले की डॉ. पदवाड व मी अनेक वेळा मीटिंग ला जात होतो. त्यांनी प्रायमरी सेंटरच्या माध्यमातून खूप चांगले वैद्यकिय सेवा कार्य केलेले आहे.

यावेळ डॉ शरद गोते म्हणाले की आमच्या तीन पिढ्यांना स्वर्गीय डॉ. पदवाड सरांनी वैद्यकीय सेवा दिलेले आहे. डॉ. पदवाड सरांच्या आठवणी आम्हाला येत राहतील. याप्रसंगी परिसरातील अनेक मान्यवरांनी आपली श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाल डॉ शैलेश कांचन पाटिल,डॉ. समीर ननावरे डॉ.राजेंद्र भोसले ,डॉ. शरद गोते, डॉ. प्रशांत शितोळे ,डॉ स्मिता सुबंध ,डॉ.विनय बोरावले, डॉ.विजय फडतरे डॉ.अतुल काळे, डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार अमोल भोसले, हवेली तालुका महानुभाव पंथाचे अध्यक्ष नंदकुमार मुरकुटे, एच. के. लोखंडे, विजय सिद्दीड ,महादेव कांचन पुष्पा पदवाड,रश्मी कुलकर्णी दत्तात्रय कांचन ,कुंभार सर, सुरेश कांचन,दत्तात्रय कांचन, दत्तात्रय काळे ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी जेष्ठ नागरिक संघाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुचिस्मिता वनारसे यांनी केले. पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या