Sunday, September 15, 2024
police dakshta logo
Homeजळगावडॉ.उल्हास पाटील यांचा बुधवारी डॉ.केतकी पाटील यांच्यासह भाजपात प्रवेश

डॉ.उल्हास पाटील यांचा बुधवारी डॉ.केतकी पाटील यांच्यासह भाजपात प्रवेश

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील Dr.Ulhas patil व त्यांची कन्या डॉ.केतकी पाटील  Dr.Ketki patil यांच्यासह मुंबईत एका कार्यक्रमात दि.२४ बुधवार रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ते भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती डॉ.उल्हास पाटील यांनी दिली आहे. यामुळे आता डॉ.उल्हास पाटलांचा कन्या डॉ.केतकी पाटील यांच्यासह भाजपात प्रवेश निश्चित झाला आहे.

दरम्यान डॉ.उल्हास पाटील यांनी या बातमीला दुजोरा दिल्याने त्यांचा भाजपामधील पक्ष प्रवेश निश्चित झालेला असून, त्यांनी गेल्या ३० वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसशी एकनिष्ठा ठेऊन काँग्रेसची ताकद वाढविली आहे. तसेच त्यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून १९९८ मध्ये निवडणुक लढवून ते काँग्रेसचे खासदार झाले होते. तर १९९९ मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या तेव्हा मात्र त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा काँग्रेसकडे असल्याने आता मात्र काँग्रेसची अडचण वाढणार आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात जळगाव जिल्ह्यामधील ५ तसेच बुलढाणा जिल्ह्यामधील १ (मलकापूर) असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ असून, केतकी पाटील आणि उल्हास पाटील यांना भाजप पक्षात प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, रावेर लोकसभा निवडणकीच्या उमेदवारीबाबत आपल्यासोबत भाजपाशी कुठलीही चर्चा झाली नसून पक्षात प्रवेश केल्यानंतर त्याबाबत भाजपातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील अशी माहिती डॉ.उल्हास पाटील यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या