“हमने इनको मार डाला है, अब तुम छोटा शकील को मार डालो नही तो तुम्हारी खैर नही” .. !
मुक्ताईनगर/पोलीस दक्षता लाईव्ह:- आमदार एकनाथराव खडसे यांना डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्या नावाने फोनवरून धमकी देण्यात आल्याचे खळबळजनक वृत्त हाती आले असून, मुक्ताईनगर पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकूण चार फोन वरून देण्यात आल्या धमक्या…
सविस्तर वृत्त अस की, चार वेगवेगळ्या फोन क्रमांकांवरून आमदार एकनाथराव खडसे यांना धमकी देण्यात आली असून, मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पहिल्यांदा करण्यात आलेल्या फोन द्वारे दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील हे मिळून आ. एकनाथ खडसे यांना मारणार असल्याचे धमकविण्यात आले. दरम्यान त्यांना अन्य तीन वेगवेगळ्या फोन द्वारे धमक्या देण्यात आल्या. अशा प्रकारे एकूण चार फोन वरून धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यात एका व्यक्तीने हमने इनको मार डाला है, अब तुम छोटा शकील को मार डालो नही तो तुम्हारी खैर नही ! अशा प्रकारची धमकी दिली असून, धमकी देण्यात आलेले सर्व फोन १३५३५९५२४४, ८१९२०२५८४०, ९३७२७४७६६०, ९७६५०७८४४४ या क्रमांकावरून दि.१५ आणि १६ एप्रिल रोजी आलेले आहेत. या प्रकरणी आ.एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात भादंवि कलम ५०७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक संदीप दुनगहू व हवालदार संजय पवार हे करत आहेत.