Wednesday, March 12, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याअपघात झाल्यास इमर्जन्सी 'क्यू आर कोड' वरून अपघातग्रस्त ची ओळख होणार मिळणार मोफत...

अपघात झाल्यास इमर्जन्सी ‘क्यू आर कोड’ वरून अपघातग्रस्त ची ओळख होणार मिळणार मोफत उपचार सुविधा

जळगाव/ प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- आपल्या जिल्ह्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अपघाताचे सत्र सुरू आहे. नवे रस्ते बनवण्याचे काम सुरू असल्यामुळे अथवा चालकाच्या चुकीमुळे अनेकदा मोठे अपघात होत असतात. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह संपूर्ण देशातच मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला. या वर्षापासून रस्ते अपघात रोखण्यासाठी सेफ वे रोड सेफ्टी सोल्युशन इंडिया व शासकीय स्वनिर्माण विश्व युवा संकल्प फाऊंडेशन यांच्या माध्यमातून चार चाकी वाहन , तीन चाकी तथा दुचाकी वाहनांवर ईमर्जन्सी क्यू आर कोड’ लावण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्यावर होणारे अपघातात अपघात ग्रस्त जखमींना तात्काळ मदत मिळावी या हेतूने क्यू आर कोड ची निर्मिती करण्यात आली आहे. अनेकदा रस्त्यांवर अपघात झाल्यास अपघात ग्रस्तांची ओळख नसल्यामुळे अपघात ग्रस्तांना मदत मिळण्यास विलंब होतो. एखाद्या व्यक्तीचा अपघात, मृत्यू झाल्यास अथवा गंभीरपणे जखमी झाल्यास या अपघाताची माहिती त्यांच्या परिवाराला मिळण्यासही किमान ५ ते ६ तासांचा अवधी लागतो. अपघातग्रस्त हा बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्यांच्या परिवाराला माहिती मिळत नाही.अपघात ग्रस्ताची ओळख पटविण्याकरिता पोलिसांना सुद्धा मोठा कालावधी लागत असतो. त्यामुळे यावर उपाय शोधण्यात आला आहे.
सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अपघातग्रस्त ला वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

एक्सीडेंट ईमर्जन्सी क्यू आर कोड प्रणाली पुढील प्रकारे काम करेल.

प्रत्येकाजवळ मोबाईल असतो परंतु मोबाईलला पासवर्ड असतो. त्यामुळे तो मोबाईल उघडता येत नाही, व अपघात झाल्यास लागलीच अपघात ग्रस्त व्यक्तींच्या परिवाराशी संपर्क करता येत नाही. त्यामुळे यापुढे अपघातग्रस्त वाहनाला ईमर्जन्सी क्यू आर कोड लावण्यात येत आहेत. यामुळे अपघातग्रस्तांचा मोबाईल नंबर कळू शकेल. तसेच एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास अपघात ग्रस्तांच्या कुटुंबियांना तात्काळ माहिती पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून एस.एम.एस सुविधेचा वापर केला जाणार आहे. याशिवाय या ‘क्यू आर कोड’ च्या माध्यमातून तात्काळ रुग्णवाहिका सेवा मिळणार आहे. यासाठी रुग्णवाहिका सेवा १०८ तथा पोलीस प्रशासन सेवेसाठी ११२ सारख्या महत्त्वाच्या बटन ची निर्मिती केली आहे. तसेच अनेकदा बऱ्याच प्रमाणावर गाड्यांच्या पार्किंगचा मोठा विषय सार्वजनिक ठिकाणी उपस्थित होतो. वाहन शिस्तबद्ध पद्धतीने राहत नाही. यावर सुद्धा आळा घालण्यासाठी या क्यू आर कोड मध्ये नो पार्किंगची माहिती देणारे बटन जोडण्यात आले आहे.

एक्सीडेंट ईमर्जन्सी क्यू आर कोड सुविधा पूर्णपणे मोफत…

हा क्यू आर कोड कुठल्याही अँड्रॉइड मोबाईल मधून सहजपणे स्कॅन केला जाऊ शकतो. ज्याला कोणालाही पैसे देण्याची गरज पडणार नाही. या क्यू आर कोड च्या माध्यमातून वाहनधारकांना अन्य सुविधा ही देण्यात येत आहेत. आपल्या जीवाची सुरक्षा आता एक्सीडेंट ईमर्जन्सी क्यू आर कोड च्या हातात. क्यू आर कोड आपल्या वाहनाला बसवा व स्वतःचा जीव वाचवा* त्यामुळे प्रत्येकाने गाडीवर हा ईमर्जन्सी क्यू आर कोड लावणे महत्वाचे आहे. असे आव्हान सेफ वे रोड सेफ्टी सोल्यूशन इंडिया व शासकीय स्वनिर्माण विश्व युवा संकल्प फाउंडेशन च्या उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख सौ. वर्षा पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या