Thursday, November 21, 2024
police dakshta logo
Homeमहाराष्ट्रएंजल हायस्कूल येथे कारगिल हुतात्मा विजय दिन साजरा

एंजल हायस्कूल येथे कारगिल हुतात्मा विजय दिन साजरा

पुणे/ उरुळी कांचन/पोलीस दक्षता लाईव्ह :- कारगिल युद्धातील वीरांचे स्मरण होण्यासाठी एंजल हायस्कूल येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विजय दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ समाज सुधारक ह भ प डॉ. रवींद्र भोळे हे होते. लद्दाख कारगिल युद्धामध्ये आपल्या देशातील सैनिकांनी सर्वस्व अर्पण करून शौर्याने लढाई जिंकली. मात्र या युद्धामध्ये अनेक शूरवीर सैनिकांना विरत्व प्राप्त झाले , शहीद झाले. आपले सर्वस्व पणाला लावून समर्पित भावनेने त्यांनी राष्ट्राची सेवा केली. त्यांचे समर्पण प्रत्येक भारतीय कधीही विसरणार नाही. शहीद जवानांच्या स्मरणार्थ कारगिल हुतात्मा दिन विजय दिन साजरा करणे म्हणजे विरत्व प्राप्त झालेल्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करून चिरंतर स्मरण करणे होय . राष्ट्रीय शौर्य दिन साजरा केल्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्भक्तीची ज्योत तेवत ठेवल्या जाते. व शहिदांचे स्मरण होऊन त्यांच्या विषयी तळमळ निर्माण होते, या अशा कार्यक्रमातूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य होते असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ समाज सुधारक ह भ प डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले.

येथे कारगिल युद्धातील वीरांचे स्मरण होण्यासाठी व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून कृतज्ञता व्यक्त करण्याच्या विजय दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये एंजल हायस्कूल येथे वरील कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे, एंजल हायस्कूलचे प्राचार्य चेतन सोनवणे व अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री सर, संस्थेचे मार्गदर्शक अविनाश शेलुकर यांनी अनमोल मार्गदर्शन केले.याप्रसंगी चेतन सोनवणे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की लदाख कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले आहे. हा विजय दिन आहे. सैनिकांचे बलिदान स्मरणात राहावे व राष्ट्रीय एकात्मता यासाठी असे उपक्रम शाळेमध्ये घेण्यात येत आहेत.

या कार्यक्रमात राष्ट्रभक्तीपर गीते गायनात आली. विद्यार्थ्यांनी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून कारगील शौर्य , विजय दिनानिमित्ताने भाषणे केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओलगा मिस ह्यांनी केले. कार्यक्रमाचे आभार समीर शेख सर यांनी केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या