फैजपूर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- फैजपूर शहरातील स्टेट बँकेच्या शाखेत सोमवारी रात्री चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, सुदैवाने हा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास स्टेट बँकेच्या इमारतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. बँकेतील सुरक्षाव्यवस्था व तत्काळ प्रतिसादामुळे त्यांचा डाव फसला. या घटनेची माहिती पहाटेच्या सुमारास कर्मचाऱ्यांना मिळताच फैजपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.दरम्यान बँकेच्या शेजारील एका मसाला दुकानात चोरट्यांनी घुसून काही रोकड लांबवल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून त्याच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून अधिक तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.