Friday, November 22, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याफुग्यात हवा भरताना गॅस सिलिंडरचा स्फोट; फुगेवाल्याचा मृत्यू; ११ मुले गंभीर जखमी

फुग्यात हवा भरताना गॅस सिलिंडरचा स्फोट; फुगेवाल्याचा मृत्यू; ११ मुले गंभीर जखमी

लातूर/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- राज्यातील अनेक शहरात छोट्या मोठ्या धक्कादायक घटना घडत असतांना आता लातूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लातूर शहरातल्या तावरजा कॉलनी भागातमध्ये रविवारी संध्याकाळी फुग्यात हवा भरताना गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन फुगेवाल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फुग्यात हवा भरणाऱ्या नायट्रोजन हेलियम गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला.
या स्फोटात फुगे विक्रेत्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर फुगे घेण्यासाठी आलेले 11 लहान मुले देखील गंभीर जखमी झाले आहेत. राम इंगळे (वय 45) असं मयत फुगेवाल्याचं नाव आहे. बीड जिल्ह्यातल्या वाघाळा-राडी येथील तो रहिवासी होता. तो आज फुगे विकत लातूर शहरातल्या तावरजा कॉलनीत आला होता. मात्र फुग्यात हवा भरतानाचा सिलिंडरचा स्फोट झाला आणि ही दुर्दैवी घटना घडली आहे. जखमी बालकांवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान रात्री उशिरा जिल्हाधिकारी यांनी जखमी मुलांची भेट घेऊन विचारपूस केली. अशा अनधिकृत स्फोटक वस्तू घेऊन फिरणाऱ्या फेरीवाल्यांवर तात्काळ सरकारने बंदी घालावी, अशी मागणी जखमी मुलांचे पालक करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या