Friday, November 22, 2024
police dakshta logo
Homeमहाराष्ट्रगणेशोत्सव मंडळांसाठी मोठा निर्णय, आता ५ वर्षांसाठी एकदाच परवानगी

गणेशोत्सव मंडळांसाठी मोठा निर्णय, आता ५ वर्षांसाठी एकदाच परवानगी

मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षाकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी देण्याबाबत निर्णय घेटला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे गेल्या दहा वर्षांत उत्सवात सर्व नियम, कायकायद्यांचे पालन करणाऱ्या, व मंडळांवर कोणत्याही तक्रारी नसलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांना यापुढे येणाऱ्या आगामी वर्षांसाठी आणखी उत्कृष्ट नियोजन करता येणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मागणी करण्यात आली होती. यावेळी एका याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांकडेही लक्ष वेधण्यात आले होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगर विकास विभाग यांनी शासन निर्णय जाहीर केला आहे.उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पुढील पाच वर्षाकरिता एकदाच परवानगी देण्याबाबत हा निर्णय घेण्यात आला.उत्सवाकरिता यापूर्वी वेळोवेळी विहित केलेल्या शासन निर्णय, आदेश यानुसार अटी, शर्तीचे मंडळांना पालन करावे लागेल. मंडळांना स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून ऑनलाईन माध्यमातून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडे परवानगीसाठी अर्ज करावा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या यांच्या या शासन निर्णयानुसार यावर्षीच्या १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात शासन नियमांचे व कायद्यांचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांकरिता परवानगी देण्याची कार्यवाही सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका व नगरपंचायती यांनी करावी लागणार आहे.
महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती यांच्या मालकीच्या जागेवर गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जागा देतांना नाममात्र असे शंभर रुपये भाडे घेता येईल.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या