जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- गणेशोत्सवाच्या अनुषंगाने विसर्जन मार्गाची तसेच मेहरुण तलावावरील विसर्जन स्थळाची पाहणी आमदार राजू मामा भोळे यांनी केली. या वेळी गणेश मंडळांना होणाऱ्या अडचणी संदर्भात आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते, पोलीस उपाधीक्षक नितीन घनापुरे, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे तसेच संबंधित पोलीस निरीक्षक, महावितरणचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.