Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावघरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपींस जळगाव रेल्वे स्थानकावर अटक

घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपींस जळगाव रेल्वे स्थानकावर अटक

जळगाव/प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- दि.५ एप्रिल रोजी रामेश्वर कॉलनी परीसरात मेहरूण बगीच्या जवळ गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयित आरोपींपैकी एकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान इतर चौघे आरोपी फरार झाले होते. त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, दि.5 रोजी रात्री 10 वा.सुमारास विशाल राजु अहीरे, आशुतोष सुरेश मोरे दिक्षांत देविदास सपकाळे, शुभम भिकन चव्हाण, गोपाल सिताराम चौधरी सर्व रा. रामेश्वर कॉलनी परीसर असे मेहरूण बगीच्या जवळ रात्री अंधारात काही तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने तयारी करून थांबले असल्याबाबत ची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे सदर ठिकाणी पोलिसांकडून छापा टाकण्यात आला होता. छापा टाकला त्यावेळी आशुतोष सुरेश मोरे हा गावठी कट्टयासह मिळुन आला होता. बाकी ईतर सर्व आरोपी पळून गेले होते. त्या गुन्ह्यातील आरोपी विशाल राजु अहीरे हा सुध्दा गुन्हा घडला त्या दिवसापासून फरार होता. या दरम्यान पोलीस निरीक्षक जयपाल हीरे यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, सदर या फरार असलेला गुन्हयात पाहीजे असलेला विशाल राजु अहीरे हा रेल्वेने जळगाव येथे येत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने जळगाव रेल्वे स्टेशन येथुन पो.उप.निरिक्षक दिपक जगदाळे, स.फो.अतुल वंजारी, पो.ना, सुधीर सावळे, इमरान सैय्यद, योगेश बारी, पो.कॉ.साईनाथ मुंडे यांनी रेल्वे स्टेशन मधुन बाहेर पडत असतांना त्याला ताब्यात घेतले होते. व त्यास अटक करण्यात आली. आरोपीला न्यायमुर्ती श्रीमती सुवर्णा कुलकर्णी यांचे न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसांची पोलीस कस्टडी रीमांड देण्यात आली आहे. त्याच्यावर यापूर्वी शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे 7 गुन्हे तर शनीपेठ पोलीस स्टेशन येथे 1 गुन्हा दाखल आहे. दरम्यान पुढील तपास सुरू आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या