Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमजळगाव शहरातील गुरूदेव नगरातील गोदामावर छापा; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

जळगाव शहरातील गुरूदेव नगरातील गोदामावर छापा; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

गुटखा गोदामावर छापा; एक जण ताब्यात; एक फरार…!

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- राज्यात बंदी असलेला गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखूचा ९ लाख ९१ हजार ६०० रुपये किमतीचा साठा ९ लाख रुपये किमतीची २ वाहने व रोख २३ हजार रुपये असा एकूण १९ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मद्देमाल जळगाव शहरातील गुरूदेव नगरातील गोदामातून एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला.या प्रकरणी भगवान साहेबराव पाटील (३०, रा. आव्हाणी, ता. धरणगाव) याला अटक करण्यात आली असून यातील एक जण फरार झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार जळगाव शहरातील गुरुदेव नगरात एका शोरुमच्या पाठीमागे असलेल्या गोदामात गुटखा ठेवला असून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. दि.१० नोव्हेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी ५ वाजल्याच्या दरम्यान पोलीस पथकाने गोदामावर छापा टाकला. त्या ठिकाणी सर्व प्रकारचे पानमसाला, गुटखा, तंबाखू, जर्दा, सुगंधित तंबाखू असा एकूण नऊ लाख ९१ हजार ६०० रुपये किमतीचा साठा आढळला. त्यासह जागेवर मिळालेले दोन वाहने व रोख २३ हजार रुपयेदेखील पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी भगवान पाटील याला अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला.

याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकातील पोहेकॉ रवींद्र पाडवी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या