Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeक्राईमगो मातेवर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्यास फाशीची शिक्षा व्हावी ; हिंदू संघटनांतर्फे प्रांताधिकाऱ्यांना...

गो मातेवर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्यास फाशीची शिक्षा व्हावी ; हिंदू संघटनांतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

भुसावळ/प्रतिनिधी – गो-मातेवर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या दस्तगीर गनीशेख याला फाशीची शिक्षा व्हावी
अशी मागणी करण्यात आली आहे, याबाबतचे निवेदन विविध हिंदू संघटनांनी प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.
बीड जिल्ह्यातील कोरडेवाडी येथे गायरान जागेवर गायीला नेत चारही पाय बांधून नराधम गनीशेख याने गाईवर अनैसर्गिक कृत्य केले.
गाय ओरडू लागल्यावर परिसरातील ग्रामस्थांनी धाव‌ घेतली असता विचित्र चित्र त्यांनी बघितले. ग्रामस्थांनी फोटो आणि व्हिडीओ चित्रीकरण केले.
” जर तुम्ही बाहेर सांगितल्यास तुमचे हातपाय तोडून काढेल ” अशा धमकीवजा भाषेत तो बोलू लागला.निर्भीड ग्रामस्थांनी न घाबरता सत्यता बाहेर आणत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरोपी दस्तगीर गनीशेख याला फाशीची शिक्षा व्हावी ह्या मागणीसाठी
भुसावळ येथील हिंदू संघटनांनी गोरक्षक,गोप्रेमी बांधवांनी निवेदन दिले
अश्या नराधमाला फाशी नाही झाल्यास कठोर आंदोलन करण्यात येईल असे गोरक्षक रोहित महाले यांनी सांगितले.
उपस्थित
गोरक्षक प्रताप सिंह परदेशी,अरविंद वाजपेयी,रोहित महाले,मयुर सावकारे,विपुल रणधीर,पंकज भोई,शुभम भोई,हेमंत हजारे,संदीप भोई,हरीश पंडीत,अनिल लोडते संदीप बावरे,चेतन पवार,अनिकेत साळी खुशवंत सोनवणे आणि समस्त गो-प्रेमी बांधव यांची उपस्थिती होती

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या