Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यासामान्य ग्रामीण तरुण सौरऊर्जा, सेंद्रिय शेती आणि गोसंवर्धनाच्या माध्यमातून घेतोय भरारी..!

सामान्य ग्रामीण तरुण सौरऊर्जा, सेंद्रिय शेती आणि गोसंवर्धनाच्या माध्यमातून घेतोय भरारी..!

जिद्दीच्या उजेडा’ची यशोगाथा; रितेश माळी यांचा प्रवास म्हणजे एक प्रेरणा…

अमळनेर (कळमसरे)/प्रतिनिधी /पोलीस दक्षता लाईव्ह:– अत्यंत साध्या आणि खडतर परिस्थितीतून शिक्षण घेतलेला एक ग्रामीण युवक आज पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि गोसंवर्धनासारख्या क्षेत्रात प्रेरणादायी कार्य करत आहे. रितेश मधुकर माळी यांची ही कहाणी आहे त्यांनी जिद्द, मेहनत आणि दूरदृष्टी यातून साकारले आहे स्वप्न.

बालपणात पेपर वाटणारा रितेश, वडिलांच्या निधनानंतर खंबीरपणे उभा राहिला. कोणतीही पाठराखण नसताना स्वतःच्या कष्टावर डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग पूर्ण केले. पुण्यात नोकरी करताना त्यांनी सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये अनुभव घेतला आणि अखेर मोठी नोकरी सोडून जळगावात व्यवसायासाठी परतले.२०२० मध्ये त्यांनी स्थापन केलेली ‘सिद्धेशा ऑरगॅनिक एनर्जी’ ही कंपनी सेंद्रिय शेती, गोसंवर्धन व सौरऊर्जा यावर आधारित आहे.

गोशाळेतून गोमूत्र, शेण, दुध यांचा उपयोग जैविक उत्पादनासाठी केला जातो. ३० ते ५० गायींची सेवा ते स्वतःच्या गोशाळेत करतात. ‘सिद्धेशा रिन्यूएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड’ या माध्यमातून विविध राज्यांतील सौर प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला आहे. याशिवाय ‘NEXTSTEP’ या ब्रँड अंतर्गत पॉवर ईले. सोल्यूशन्स तर ‘आर्टसम इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड’च्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणूकही सुरु आहे.

रितेश माळी यांचा प्रवास म्हणजे एक प्रेरणा आहे – परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द असेल, तर यश उजळतं हे मात्रं नक्की !

संपर्क: सिद्धेशा ऑरगॅनिक एनर्जी,
जगताप बिल्डिंग, ७६ हौसिंग सोसायटी,
२६/२०४ नूतन मराठा विद्यालयासमोर, जळगाव
मो.: 8975321919 / 7264921111

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या