बोदवड/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :-गुढीपाडवा व नातू आरव ललवाणी याच्या वाढदिवसाचे ओचित्य साधून ललवानी फाउंडेशनच्या वतीने बोदवड येथील आत्मसन्मान फाउंडेशन या गरजू रुग्ण ,बेघर, बेवारस अवस्थेत भटकंती करणाऱ्या रुग्णांना व तसेच खरोखरच ज्यांना कुटुंब सांभाळू शकत नाही अशा व्यक्तींना कुटुंबाप्रमाणे सांभाळणाऱ्या आत्मसन्मान फाउंडेशनच्या संचलीत निवासी मनोरुग्ण पुनर्वसन प्रकल्पातील व्यक्तींना गोडधोड जेवण देऊन मनाला शांती मिळाल्याचे क्रुतार्थ ऊदगार ललवाणी परीवाराचे अर्ध्वयु मदनलाल ललवाणी यांनी काढले.
डांँ.विजय पाटील यांनी सेवाभावनेतुन स्थापन केलेल्या आत्मसन्मान फाउंडेशन चे कार्य खरोखरच आजच्या पिढीला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारे आहे. या फाउंडेशनने अल्पावधीतच सेवेसारखे महान कार्य करून कोणताही गाजावाजा न करता समाजातून टाकून दिलेल्या लोकांना आधार देण्याचे महान कार्य केले आहे .याप्रसंगी संस्थेचे व्यवस्थापक वासुदेव साखरे यांनी ललवाणी परिवाराचे अभिनंदन करून वाढदिवसाचे व गुढीपाडव्याचे औचित्य साधून केलेल्या कार्याचे कौतुक केले.
ललवाणी फौंडेशनचे अध्यक्ष व कोटेचा महिला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. डि. एम. ललवाणी यांनी नमुद केले की , या कार्याने स्वतःला विचार करण्यास भाग पाडले की आजच्या या युगात स्वतःची पोटची मुलं आपल्या आई-वडिलांना सांभाळत नाही मात्र आत्मसन्मान फाउंडेशन हे महान कार्य करीत आहे या कार्याला माझा सलाम व यापुढे मी माझ्या परीने मदत देण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन दिले . त्यांना येथील सेवाभाव व्रुत्ति व सर्व परिस्थिती पाहून गहिवरून आले. आजचा सण आम्ही या सेवादासासमवेत व्यतीत करुन सार्थकी लागला असे सौ.शोभा ललवाणी यांनी नमुद केले.
ललवाणी परीवाराने तेथील सर्व मनोरुग्णाची भेट घेवुन आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच स्वहस्ते सर्वांना वाढण्याची सेवा दिली. शुभांगी पाटील,आकाश बाविस्कर व मनिषा तेली हे सर्व मनोरुग्णाची कुटुंब सदस्याप्रमाणे काळजी घेतात.