Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeक्राईमगुजरात मेड युरिया व केमिकल मिश्रित १२ लाखांचा खवा भुसावळ पोलिसांनी केला...

गुजरात मेड युरिया व केमिकल मिश्रित १२ लाखांचा खवा भुसावळ पोलिसांनी केला जप्त

भुसावळ /पोलीस दक्षता लाईव्ह टीम:– दरवर्षी सण-उत्सव जवळ आले की,बनावट खवा मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यात गुजरात मधून विक्रीस येत असतो. आगामी सणांच्या पाश्वभूमी वर संपूर्ण महाराष्ट्रात (गणेश उत्सव) निमित्त बाप्पाला मोदक, मिठाई, पेढ्यांचा प्रसाद मोठ्या प्रमाणात चढवितात हे सर्व पदार्थ बनविण्यासाठी विक्रेते खव्याचा सरार्स वापर करीत मोठ्याप्रमाणात विक्री करतात. यापासून अधिक फायदा कसा होईल हे लक्ष डोळ्यासमोर ठेवुन संबंधितांनी यांचा फायदा घेत अहमदाबाद (गुजरात) येथून युरिया व केमिकल मिश्रित खवा बुलडाण्याकडे घेऊन जात असल्यांची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस कृष्णात पिंगळे यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पथकास सूचना देऊन नहाटा चौफुलीवर थांबवून संशयित ट्रॅव्हल्स थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये केमिकल मिश्रित ‘ खवा ‘ पाच टन बँग भरलेल्या मिळून आल्या आहे. या कारवाई मुळे डेअरी चालक, हॉटेल तसेच मिठाई विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार (ता. २२) सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बनावट खवा (मावा) गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून युरिया आणि केमिकल मिश्रित सदृश बनावट खवा’ तीस किलो वजनांचा १३६ पॅकिंग केलेल्या बॅग व ४२ खोके असे एकूण १७८ प्रत्येकी तीस किलो प्रमाणे एकूण ५३४० किलो बनावट खवा (एम.के. बस. सर्व्हिस) वाहन क्रमांक (जी.जे. ०१.ई.टी. १२१०) या ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या आणून पुढील विक्रीसाठी आयशर क्रमांक (जी. जे. ३८ . टी. ए. १८००) मध्ये लोड करीत बुलडाणा येथे पोहच करण्यासाठी घेऊन जात असल्यांची माहिती उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांना मिळाल्यावरून पथकास सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.

संबंधित पथकाने भुसावळ शहरातील नाहाटा कॉलेज चौफुलीवर थांबवून संशयित  संशयित ट्रॅव्हल्सची तपासणी केली असता ट्रॅव्हल्स मध्ये एकही प्रवाशी नव्हता. संपूर्ण ट्रॅव्हल्स ही केमिकल मिश्रित ‘ खवा ‘ बॅगांनी भरलेली मिळून आली. सदरील पथकाव्दारे तीस किलो वजन असलेला एकूण पाच हजार तीनशे चाळीस किलो बनावट खवा युरिया आणि केमिकल मिश्रित केलेला (११,७४,८००) रुपयांचा मुद्देमाल तसेच ट्रॅव्हल्स चालक कन्नू पटेल (वय ३७) राहणार आमदाबाद व आयशर वाहन चालक सैय्यद साबीर सैय्यद शब्बीर (वय ३५) राहणार आमदाबाद (गुजरात) यांचेसह एक ट्रॅव्हल्स व आयसर ताब्यात घेऊन सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे, तसेच अन्न आणि औषधी प्रशासन अधिकारी शरद पवार यांचेकडे पुढील योग्य कारवाईसाठी मुद्देमाल वर्ग करण्यात आला. सदरील जप्त करण्यात आलेली वाहने तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आली आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या