जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, राजे छत्रपती कॉलनी, जळगाव येथे आज (१५ ऑगस्ट) ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. याचसोबत गोकुळाष्टमीचा उत्सवही आनंदात साजरा करण्यात आला. एस.एस. इंग्लिश मीडियम स्कूल, माऊली नगर, भुसावळ रोड येथे देखील स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री गणेश भाऊ चव्हाण (अध्यक्ष, शिवसह्याद्री प्रतिष्ठान तसेच शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नशिराबाद) यांनी भूषविले. त्यांच्या हस्ते दोन्ही शाळांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.
सरस्वती पूजनाचा मान सौ. मंदाताई सोनवणे (आक्रमक संघटना) यांना मिळाला. राष्ट्रीय ध्वजाला सलामी देताना श्री गणेश भाऊ चव्हाण यांच्यासह ज्ञानेश्वर चौधरी (ग्रामीण तालुका अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस), गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष अनिल सपकाळे व आशा सपकाळे, दीपक कोळी, किरण नांद्रे, मुख्याध्यापक, तसेच एस.एस. इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका स्नेहा सोनवणे, शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सार्थक सिद्ध सेवा फाउंडेशनच्या संचालिका सौ. लक्ष्मी सम्राट कुमावत, सौ. भाग्यश्री किरण भालेराव, सौ. रत्नाबाई बाविस्कर आदी मान्यवरांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमात देशभक्तीपर गीत, भाषण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

