जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (८ ऑगस्ट) रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हरीविठ्ठल नगर येथील जुगार अड्ड्यावर कारवाई करत नऊ जणांना ताब्यात घेतले. या छाप्यात सुमारे ३ लाख १४ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, यात रोख रक्कम, मोबाईल फोन आणि मोटारसायकलींचा समावेश आहे.
गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली पथकाला कारवाईचे आदेश दिले. रात्री सुमारे १० वाजता छापा टाकून आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. सर्वांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या मोहिमेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शरद बागल, पोहका अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, पोना किशोर पाटील आणि पोशि रवींद्र कापडणे यांनी सहभाग घेतला.