मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मुंबई आएमडीने राज्यातील २३ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.राज्यात पावसाने पुन्हा एकदा पाऊस पावसाला सुरुवात झाली असून यामुळे बळीराजा सुखावला आहे. शेतीच्या कामांना वेग आला असून पुढच्या काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.अशात हवामान खात्यातर्फे आज अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनीही घराच्या बाहेर पडताना काळजी घ्यावी, पावसाचा अंदाज घ्यावा, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.
मुंबई आयएमडीने यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील २२ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये ठाणे, रायगड,पालघर,जळगाव,धुळे, नंदुरबार, लातूर, नांदेड, परभणी, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, नांदेड, यवतमाळ, नागपूर, अमरावती, वर्धा, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात मात्र हलक्याचे मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्येही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे घाट परिसरात मुसळधार पाऊस कोसळेल. खरंतर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे चक्रीय वादळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यभर पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
नंदुरबार, धुळे, नाशिक, नांदेड, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही तास या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घेऊन आणि खबरदारी घ्यावी अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.