Friday, February 27, 2026
police dakshta logo
Homeजळगाव“हिंद दी चादर” उपक्रम शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात उत्साहात संपन्नl

“हिंद दी चादर” उपक्रम शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात उत्साहात संपन्नl

गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहीद दिनानिमित्त मानवता, शौर्य व सहिष्णुतेचा संदेश

जळगाव | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात बुधवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभाग प्रायोजित “हिंद दी चादर” हा मानवता, शौर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक असलेला उपक्रम उत्साहात संपन्न झाला. शीख पंथाचे नववे सद्गुरु गुरु तेगबहादुर यांच्या ३५० व्या शहीद दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सद्गुरु गुरु तेगबहादुर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी गुरु तेगबहादुर यांच्या चित्र रंगभरण स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले.कार्यक्रमासाठी राष्ट्रीय प्रवक्ता हरजीतसिंग बावरी, सुरेंद्रसिंग जोहरी, ॲड. अविनाश खडके, श्रीमती रचना रमणीकसिंग ग्रोवर, जळगाव गुरुद्वाराचे सचिव जगजीत सिंग छाब्रा, शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, पर्यवेक्षक संजय वानखेडे व पर्यवेक्षिका सौ. रमा तारे यांची प्रमुख उपस्थिती होती.हरजीतसिंग बावरी यांनी आपल्या मार्गदर्शनात गुरु तेगबहादुर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत विविध समाजघटकांना अन्यायापासून वाचविण्यासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाचे महत्त्व अधोरेखित केले. सत्य, मानवता आणि धर्मनिष्ठा या मूल्यांचा स्वीकार करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. सुरेंद्रसिंग जोहरी आणि ॲड.अविनाश खडके यांनीही विचार मांडताना शौर्य व सहिष्णुतेचा संदेश दिला.

जळगाव गुरुद्वाराचे सचिव जगजीत सिंग छाब्रा यांनी शिख समाजाचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान स्पष्ट केले. रचना रमणीकसिंग ग्रोवर यांनी ३५० व्या शहीद समागम कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत “कोणाला घाबरू नका आणि कोणाला घाबरवू नका” असा संदेश विद्यार्थ्यांना दिला व गुरु तेगबहादुर यांच्या विचारांचे आचरण करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय वानखेडे यांनी केले. आभार प्रदर्शन ए. बी. पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन सोमनाथ महाजन यांनी केले. रंगभरण स्पर्धेसाठी कलाशिक्षक प्रेम कुमार सारस्वत आणि सौ. नीलिमा सपकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उल्हास ठाकरे, मिलिंद देशपांडे, हिम्मत काळे, हेमंत सपकाळे, गौरव देशमुख, श्रीकांत घुगे, आनंदा चौधरी, सुभाष पाटील, किशोर माळी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या