Sunday, July 13, 2025
police dakshta logo
Homeक्राईमघरगुती गॅसचा काळाबाजार उघड : तीन जण अटकेत!

घरगुती गॅसचा काळाबाजार उघड : तीन जण अटकेत!

३३ घरगुती आणि २८ व्यावसायिक गॅस सिलेंडर, एकूण ६१ सिलेंडरचा साठा जप्त.

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील आसोदा रोडवरील मोहन टॉकीज परिसरात घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तिघांवर शनिपेठ पोलिसांनी मंगळवारी (१७ जून) दुपारी दीड वाजता मोठी कारवाई करत ३३ घरगुती आणि २८ व्यावसायिक गॅस सिलेंडर असा एकूण ६१ सिलेंडरचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी संबंधित तिघांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहन टॉकीज परिसरात गॅसचा अवैध साठा आणि काळाबाजार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी विशेष पथक तैनात केले. या पथकाने कारवाई करत गॅस सिलेंडर भरायचे साहित्य, वजन काटा व खासगी वाहन देखील ताब्यात घेतले आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे – राहुल नारायण सोनवणे (वय २९), राकेश नारायण सोनवणे (वय २५), आदेश राजू पाटील (वय २३) तिघेही जळगावातील मोहन टॉकीज परिसरातील रहिवासी आहेत. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या