जळगांव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- ” बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे अनेक आजार वाढलेले आहेत त्यामुळे आरोग्याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झालेली असून लसीकरण, गुटखामुक्त जीवन आणि निरोगी जीवनशैली या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास आपण कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून निश्चितपणे दूर राहू शकतो,” असा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला. ग्रामगौरव प्रकाशनाच्या वतीने चांडक कॅन्सर हॉस्पिटल,जळगाव जिल्हा परिषद व जैन समुहाच्या कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक कॅन्सर दिनानिमित्त ‘चला कॅन्सरला हरवू या’ परिसंवाद कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाला यांची होती प्रमुख उपस्थिती
डॉ.निलेश चांडक,जिल्हा दूध संघांचे संचालक अरविंद देशमुख ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल, एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी,दैनिक साईमतचे संपादक प्रमोद बऱ्हाटे,मुस्लिम धर्मगुरू आणि व्हाईस ऑफ मीडियाचे उर्दू राष्ट्रीय अध्यक्ष हाजी मुक्ती हारून,अ.भा.सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,अमरावती सिव्हिल न्या.श्वेता चांडक,ओमप्रकाश चांडक,लायन्स क्लबचे अध्यक्ष निलेश संघवी,उद्योजक आणि ग्रामगौरवचे संचालक संपादक रवींद्र नवाल,डॉ.श्रद्धा चांडक, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव नरवाडे, उपाध्यक्ष सचिन महाले,ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार गोराडे,सचिव संजय भारंबे, चांडक हॉस्पिटलचे सीईओ विनय चांडक,व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे आवाहन
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी राज्यासह जळगाव जिल्ह्याच्या आरोग्य परिस्थितीवर भाष्य करतांना स्पष्ट केले की,राज्य शासनाने कॅन्सरच्या संदर्भामध्ये मुलींना व्हॅक्सिन देण्याचा निर्णय नुकताच घेतला असून शंभर टक्के लसीकरण करण्याचे आवाहन केले.जळगावमध्ये सुरु असलेल्या मेडिकल हबच्या प्रगतीची सुद्धा त्यांनी माहिती दिली.कुपोषणाच्या सद्याच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करून कॅन्सरला आळा घालण्यासोबतच जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्याची ग्वाही दिली. यावेळी कॅन्सरच्या शस्त्रक्रिया यशस्वी होऊन यावर मात केलेल्या केतन वाघोदे,वर्षा घोंगरे,विशाल कोळी, तुळसाबाई हटकर,पारू भाटिया, योगिता सोनवणे,शीतल पाटील, स्वप्निल नेहते,हेमा पगारे,अतिक सिद्धीकी, सविता धनगर,चंद्रा एकशिंगे,संगीता जुमळे आदी रुग्णांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ.निलेश चांडक यांनी विपरीत परिस्थितीत पैसे नसतांना देखील केलेल्या शस्त्रक्रिया आणि त्यामुळे मिळालेले जीवदान याबाबत कॅन्सर रुग्णांनी मांडलेले अनुभव हे अत्यंत हृदयस्पर्शी आणि अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारे ठरले.
या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी केले मनोगत व्यक्त..
परिसंवादाच्या दुसऱ्या सत्रात डॉ.निलेश चांडक यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कॅन्सरचे प्रकार आणि त्यावर उपाययोजना याची सविस्तर माहिती त्यांनी चित्रफितीतून सादरीकरण करत दिली.मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची आणि सहाय्यता निधीची प्रणाली या मदत कक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख डॉ. मोईज देशपांडे यांनी उपस्थितांना समजावून सांगितली.मुक्ती हारून, सुरेश उज्जैनवाल, सरपंच परिषदेचे जयंतराव पाटील यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.परिसंवाद कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामगौरव प्रकाशनाचे समूह संपादक विवेक ठाकरे यांनी केले.सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदक व कलावंत तुषार वाघूळदे आणि ज्योती राणे यांनी केले.आभार डॉ.श्रद्धा चांडक यांनी मानले. ‘ग्रामगौरव’चे दिनेश दीक्षित,भाग्यश्री ठाकरे,सुभाष मराठे,गौरव रणदिवे, दस्तगीर खाटीक,युवराज प्रजापत, नदीम शेख,मुज्जफर पटेल आदींनी परिश्रम घेतले.
आरोग्यदूत अरविंद देशमुख यांना ‘लोकमित्र’ सन्मान..!
जिल्हा दूध उत्पादक संघांचे संचालक अरविंद देशमुख यांना त्यांच्या पंधरा वर्षाच्या आरोग्यसेवेतील योगदानाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘आरोग्यदूत-लोकमित्र’ पुरस्कार देण्यात आला.राज्याचे आरोग्यदूत म्हणून नावलौकिक मिळवलेले मंत्री गिरीष महाजन यांच्या सेवेचा वारसा पुढे नेतांना रुग्णांच्या चेहऱ्यावरील समाधान हाच पुरस्कार असल्याच्या विनम्र भावना अरविंद देशमुख यांनी व्यक्त केल्या.