Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावआंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत जळगावच्या तरुणाची दुसऱ्यांदा बाजी

आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत जळगावच्या तरुणाची दुसऱ्यांदा बाजी

मुंबई :- वन्यजीव विषयक सेंच्युरी हाँग काँग या मासिकातर्फे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत जळगावत राहणार्‍या तेजस भंगाळे या तरुणाच्या छायाचित्राला पुरस्कार मिळाला आहे.माशाच्या छायाचित्राला पारितोषिक मिळाले असून या विभागात केवळ एकच विजेता घोषित करण्यात येतो. नुकताच या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मुंबईतील ताज हॉटेल मध्ये होईल प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी आशिया खंडातील जवळपास 1 हजाराहून अधिक छायाचित्रकारांनी फोटो पाठविले होते. रोख पंचवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह, कॅमेरा बॅग, पारितोषिक आहेहा पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करत  ‘2017 ला त्याच्या मित्राला हा पुरस्कार मिळाला होता असे सांगितले. आज ते स्वप्न पूर्ण झाले असे तो म्हणाला असून पुरस्कार त्याने त्याच्या वडिलांना अर्पण करीत आहे असे सांगितले.

 

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या