Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमजळगाव : सोनसाखळी चोरी करणारे दोघे आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : सोनसाखळी चोरी करणारे दोघे आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील अयोध्या नगर भागात दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी एका महिलेकडील सोनसाखळीची जबरी चोरी करणारे दोघे आरोपी अखेर पोलिसांच्या सापळ्यात अडकले असून, एमआयडीसी पोलिसांनी ही कामगिरी वेगाने उकलली आहे.फिर्यादी महिला दुचाकीने घरी येत असताना मागून आलेल्या अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी पोत हिसकावून घेतली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने तपासाचा धागा पकडत दि. 18 नोव्हेंबर रोजी माऊली नगर भागात सापळा रचून तेजस अनिल ईखनकर (रा. ज्ञानदेव नगर, जळगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदाराचे नाव प्रसाद उर्फ परेश संजय महाजन (रा. ज्ञानदेव नगर) असे सांगितले. प्रसाद महाजन हा शनिपेठ पोलिसांत दाखल खुनाच्या गुन्ह्यानंतर पसार होता. पोलिसांनी त्यालाही दि. 19 नोव्हेंबर रोजी माऊली नगरातून अटक केली.दोघांकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालातील ८ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, किंमत अंदाजे ८०,000 रुपये असा माल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोनि बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोह प्रदीप चौधरी, पोह गिरीश पाटील, पोह प्रमोद लाडवंजारी, पोह किरण चौधरी, पोका नितीन ठाकुर, पोका किरण पाटील, पोका शशिकांत मराठे, पोका चेतन पाटील यांनी केली.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या