Friday, April 10, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नियुक्ती: अशोक नखाते यांची बदली;...

जळगाव अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नियुक्ती: अशोक नखाते यांची बदली; गृह विभागाचे आदेश जारी

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्य पोलीस दलात करण्यात आलेल्या प्रशासकीय फेरबदलांतर्गत जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलानुसार, विद्यमान अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी संदीप रघुनाथ गावित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश गृह विभागाकडून शुक्रवारी सायंकाळी निर्गमित करण्यात आले.

नवीन नियुक्त अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित लवकरच पदभार स्वीकारणार असून, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येणार आहे.
दरम्यान, संदीप गावित यांचे जळगाव जिल्ह्याशी पूर्वीपासूनच निकटचे संबंध राहिले आहेत. त्यांनी यापूर्वी जळगाव शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) म्हणून कार्य करताना प्रभावी कामगिरी बजावली होती. त्यांच्या या अनुभवाचा जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाच्या कामकाजात सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या