जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी प्रभावी कारवाई करत बकरी व बोकड चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना ताब्यात घेत मोठ्या प्रमाणावर चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या पथकाने शनिपेठ पोलीस स्टेशन मार्फत करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी सैय्यद परवेज सैय्यद आसिफ (वय २६ वर्ष) रा. दत्त मंदीर जवळ शनिपेठ यांनी दि.०९ मंगळवार रोजी शनिपेठ पो. स्टे. येथे फिर्याद दिली की, दिनांक २७/०८/२०२५ रोजी अज्ञात आरोपींनी त्यांच्या ७,००० रुपये किंमतीचा बोकड तसेच आवेश शेख यांच्या ६,००० रुपये किंमतीची बकरी चोरी केली आहे. यावरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सखोल तपास केला असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक १० बुधवार रोजी तीन आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये गणेश वासुदेव जाधव (वय २० वर्ष), गणेश अशोक पाटील (वय २१ वर्ष), अक्षय विजय वंजारी (वय २३ वर्ष) सर्व आरोपी रा. चिंचोली, ता.जि. जळगाव. असून त्यांची सखोल विचारपूस केली असता आरोपींनी चोरीची कबुली दिली. त्यांनी एमआयडीसी पो. स्टे. हद्दीतून अजून तीन बकऱ्या चोरी केल्याची कबुलीही दिली. याचबरोबर चोरी केलेले बकरी व बोकड खाटीक राहुल रतन राऊळकर यांच्याकडे विक्री केले असल्याचे सांगितले. चोरीस गेलेले बकरी खाटीक याचेकडून जप्त करण्यात आली असून, बोकड विक्रीतून मिळालेली रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. याशिवाय गुन्हा करण्यासाठी वापरलेली दोन मोटरसायकली देखील जप्त करण्यात आल्या आहेत. सदर आरोपींना पुढील तपासासाठी शनिपेठ पोलीस ठाण्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो., जळगाव, डॉ. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सफी अतुल वंजारी, पोहेकों प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, किशोर पाटील, रतनहरी गिते, सिध्देश्वर डापकर, प्रदीप चवरे व रविंद्र कापडे या पोलीस पथकाने केली.