Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगावच्या बालगंधर्व खुले नाट्यगृहात "मराठी रंगभूमी दिन" साजरा ;अनेक कलावंत एकवटले...!

जळगावच्या बालगंधर्व खुले नाट्यगृहात “मराठी रंगभूमी दिन” साजरा ;अनेक कलावंत एकवटले…!

जळगाव | तुषार वाघुळदे | पोलीस दक्षता लाईव्ह :- रंगभूमीवर काम करताना भूमिकेचा रंग लागलेल्या कलाकारांकरिता, पडद्यावर किंवा पडद्यामागचं जग अनुभवलेल्या प्रत्येकासाठी 5 नोव्हेंबर म्हणजे सणासुदीचा दिवस…! मराठी रंगभूमी दिनानिमित जळगाव जिल्ह्यातील कलाकार प्रसिद्ध बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे एकत्र आले होते .मराठी रंगभूमीला आज जवळपास 170 वर्षांच्या परंपरेचं बळ लाभलंय..1843 साली या दिवशी विष्णुदास भावे यांनी ‘सीतास्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग सांगलीत केला. या मराठीतल्या पहिल्या नागर नाट्यप्रयोगाची आठवण म्हणून हा दिवस “रंगभूमी दिन” साजरा होत असतो.रंगदेवता श्री.नटराज तसेच तबला ,पेटी आणि रंगरंगोटी पेटीचे ( मेकअप बॉक्स ) पूजन करून ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील यांनी नारळ वाढवला. प्रसंगी रंगदेवतेला वंदन करत डॉ.उल्हास कडूस्कर लिखित ‘शब्द सुरांच्या रेशीम गाठी’ या नाटकातील नांदी खान्देश नाट्य प्रतिष्ठानचे दुष्यंत जोशी, संजय कुलकर्णी यांनी गात सर्व रंगकर्मीनी नांदीने वंदन करत तबल्यावर मोहन रावतोळे , संवादिनीवर भूषण खैरनार यांनी साथसंगत दिली.

याप्रसंगी जेष्ठ रंगकर्मी पीयुष रावळ,विनय काबरा ,संजय निकुंभ,चंद्रकांत अत्रे,कलावंत,निवेदकतुषार वाघुळदे, गुलाब शेख, चंद्रकांत चौधरी, अरुण सानप,शरद पांडे, विनोद ढगे, अनिल मोरे,जग‌दीश नेवे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सदस्य गीतांजली ठाकरे ,सुभाष मराठे,संजय निकुंभ,शरद भालेराव,आकाश बाविस्कर, प्रदीप भोई, अविनाश चव्हाण, भगवंत फडणीस, महेंद्र खेडकर, पवन खंबायत, बळवंत गायकवाड, नेहा पवार, मानसी नेवे, धनंजय राजहंस, अविनाश मोघे, प्रा.सुधीर भटकर, योगेश शुक्ल, गणेश सोनार ,सचिन महाजन, सुभाष गोपाळ, नितीन तायडे, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मोहीत पाटील, अमोल ठाकूर आदींची उपस्थिती होती.सांस्कृतिक वृद्धी व्हावी.नाट्य क्षेत्र वाढीस लागावे,तसेच बालगंधर्व नाट्यगृह सुसज्ज होण्यासाठी शासनाने लवकरात लवकर प्रयत्न करून नाट्य कलावंतांना न्याय द्यावा अशी अपेक्षा रंग भूमीदिनी अनेकांनी व्यक्त केली.

खरंतर नाटकवाल्यांसाठी तो ज्या दिवशी नाटकाचा प्रयोग करतो, तो त्याचा रंगभूमी दिन असतो. त्याच्यासाठी प्रयोग म्हणजे रंगभूमीचं सेलिब्रेशन असतं आणि या उत्सवाच्या सिद्धतेसाठीच तो सतत तयारी करत असतो. नाटक डोक्यात घेऊन वावरत असतो. खरा नाटकवाला हा 24 तास नाटकवाला असतो, असं म्हणतात ते त्यासाठीच असावं..

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या