Saturday, February 7, 2026
police dakshta logo
Homeजळगावभव्य "प्रगतिशील महाराष्ट्र २०२५" प्रदर्शनाचे आज जळगावात उद्घाटन

भव्य “प्रगतिशील महाराष्ट्र २०२५” प्रदर्शनाचे आज जळगावात उद्घाटन

५४ शासकीय योजनांचे एकत्र दर्शन; नागरिकांना विनामूल्य प्रवेश

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव लोकसभेच्या खासदार सौ. स्मिताताई वाघ यांच्या संकल्पनेतून केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम, प्रगती आणि विकासाचे दर्शन घडविणाऱ्या “प्रगतिशील महाराष्ट्र २०२५” या भव्य प्रदर्शनाचे आज दि. ३ नोव्हेंबर सोमवार रोजी सकाळी १०.३० वाजता उद्घाटन होत आहे. हे प्रदर्शन शिवतीर्थ (जी.एस. ग्राउंड), जळगाव येथे ३ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले असून, नागरिकांसाठी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० पर्यंत खुले राहणार आहे.

या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबरावजी पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री मा. रक्षाताई खडसे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. संजयजी सावकारे, खासदार अॅड. उज्वलजी निकम तसेच आमदार अनिलजी पाटील, सुरेशजी भोळे (राजू मामा), मंगेशदादा चव्हाण, किशोरजी अप्पा पाटील, अमोलदादा पाटील, प्रा. चंद्रकांतदादा सोनवणे, अमोलदादा जावळे, चंद्रकांतजी पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.तसेच या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी (पश्चिम), मा. चंद्रकांत बाविस्कर (पूर्व), मा. दीपक सूर्यवंशी (जिल्हा महानगर) यांच्यासह भाजपा पदाधिकारी, जनप्रतिनिधी व केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनामध्ये एकूण ५४ शासकीय योजनांचे माहितीपूर्ण स्टॉल्स उभारण्यात आले असून, नागरिकांना शासनाच्या योजना आणि विकास उपक्रमांचा थेट अनुभव घेता येईल. या स्टॉल्समध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, वित्त, बँकिंग, विमा, आरोग्य कल्याण, कृषी, फलोत्पादन, हातमाग, हस्तकला, अंतराळ, विज्ञान, अणुऊर्जा, वाणिज्य, व्यापार, पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, पशुसंवर्धन, गृहनिर्माण व शहर विकास आदी विभागांचा समावेश आहे.या प्रदर्शनास विनामूल्य प्रवेश असून, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि युवकांना शासनाच्या योजनांची माहिती मिळविण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.

खासदार स्मिताताई वाघ यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, महिलांना, विद्यार्थ्यांना व युवकांना या भव्य प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रगतिशील महाराष्ट्राच्या वाटचालीचा साक्षीदार होण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या