Saturday, March 14, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव-भुसावळमधील ऊर्जा कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करा – मंत्री संजय सावकारे यांचे...

जळगाव-भुसावळमधील ऊर्जा कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करा – मंत्री संजय सावकारे यांचे निर्देश

मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव व भुसावळ परिसरातील प्रलंबित ऊर्जा विषयक कामांचा आढावा घेण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या उपस्थितीत निर्मल भवन येथील एमएसआरडीसी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत जळगाव तसेच भुसावळ येथे सुरू असलेली सर्व ऊर्जा विषयक कामे ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना देण्यात आले.उपकेंद्रांची रोहित्र क्षमता वाढविणे, नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे आदी महत्त्वाची कामे पावसाळ्यात करणे शक्य नसल्यामुळे ती पुढील दोन महिन्यांत तातडीने पूर्ण करून घ्यावीत, असेही निर्देश मंत्र्यांनी दिले.

बैठकीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० तसेच एआयआयबी (AIIB) योजनेंतर्गत भुसावळ विभागातील जळगाव मंडळ व जळगाव परिमंडळात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.ऊर्जा पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी सुरू असलेल्या कामांना गती देऊन शेतकरी व नागरिकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या