जळगाव/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह :- नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुक प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात जळगाव जिल्ह्यातील पाच जागांचा समावेश आहे.
विद्यमान आमदारांनाच उमेदवारी कायम
आज दि.२० ऑक्टोंबर रोजी भाजपतर्फे ९९ मतदारसंघांची उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर, जामनेर, चाळीसगाव, रावेर, भुसावळ अशा पाच मतदारसंघांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील पाच मतदार संघात भाजपने जाहीर केलेल्या उमेदारांमध्ये जामनेर मधून ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, जळगाव शहर येथून विद्यमान आमदार राजूमामा भोळे, भुसावळ मतदार संघातूनआमदार संजय सावकारे, चाळीसगावातुन आमदार मंगेश चव्हाण, तर रावेर व यावलमधून भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांचा समावेश आहे. यावरून स्पष्ट जाहिर होते की भाजपने कोणत्याही विद्यमान आमदाराचे तिकिट कापले नाही तर भाजपने जळगाव जिल्ह्यात सेफ खेळी केल्याचे दिसून येत आहे. तर निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच भाजपचे उमेदवारांची नावे जाहीर केले होते. यावरून भाजपने जळगाव येथून विद्यमान आमदार यांची उमेदवारी जाहीर करून विरोधकांना आपली ताकद दाखविल्याचे बोलले जात आहे.