Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeक्राईमबसस्थानकात मंगळसूत्र चोरी करणाऱ्या दोन महिला ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बसस्थानकात मंगळसूत्र चोरी करणाऱ्या दोन महिला ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

दोन गुन्ह्यांची उकल, चोरीचा मुद्देमाल जप्त.

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र पोत वारंवार चोरीस जात असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या या तपासात दोन संशयित महिलांना अटक करून त्यांच्या कृत्यांची उकल करण्यात आली आहे. तपास पथकाने माया दहिमल भोसले उर्फ माया उदय पवार (वय २०) आणि अंकिता अर्जुन पवार (वय ३५, दोघी रा. पळासखेडा, ता. चिखली, जि. बुलढाणा) यांना ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांनी मागील एक ते दीड महिन्याच्या कालावधीत जळगाव बसस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र पोत दोन वेळा चोरी केल्याची कबुली दिली.त्यांच्या कबुलीच्या आधारे जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या अभिलेखांची पाहणी केली असता, गुरनं. ३१५/२०२५ व गुरनं. ३१८/२०२५ अन्वये BNS ३०३(२) प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले. सदर गुन्ह्यांतील चोरीचा मुद्देमाल तपासकामी जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपी महिलांना मुद्देमालासह जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि. जितेंद्र वल्टे, शेखर डोमाळे, रवी नरवाडे, पोहेकॉं गोपाल गव्हाळे, हरीलाल पाटील, संदीप पाटील, प्रविण मांडोळे, पोअं. गोपाल पाटील, राहुल कोळी, मपोहेकॉं अभिलाषा चहाटे, मपोना. श्रद्धा सोनवणे, मपोअं. दर्शना पाटील, प्रियंका कोळी, मंगला तायडे व चालक पोहेकॉं दिपक चौधरी यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या