Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeक्राईमजळगाव शहरात बसस्थानकात खिसे कापणाऱ्या अट्टल गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश

जळगाव शहरात बसस्थानकात खिसे कापणाऱ्या अट्टल गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश

आरोपींकडून 5 लाख 51 हजाराचा मुद्देमाल जप्त.

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या आरोपींकडून एकूण ५ लाख ५१ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की,दि.२५ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार प्रविण भालेराव व अक्रम शेख यांना गोपनीय माहिती मिळाली की, अमरावती येथील खिसे कापणारे काही गुन्हेगार जळगाव बस स्थानक परिसरात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनेनुसार, पो.उ.नि. शरद बागल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने परिसरात पेट्रोलिंग सुरू केले. गर्दीच्या ठिकाणी संशयास्पद हालचाली करत असलेले तीन इसम पोलीसांना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे अहमद बेग कादर बेग (वय ६२), हफिज शाह हबीब शाह (वय ४९), आणि अजहर हुसैन हफर हुसेन (वय ४९) अशी सांगितली. तिघेही अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी जळगाव बसमध्ये प्रवाशाच्या खिस्यातून दोन बंडल १०० रुपयांच्या नोटा चोरल्याचे कबूल केले.

या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ ३३,८३०/- रोख रक्कम, १७,५००/- किंमतीचे ५ मोबाईल, १ रेक्झीन बॅग, ५,००,०००/- किंमतीची टाटा इंडिका व्हिस्टा कार असा एकूण मुद्देमाल ५,५१,५३०/- मुद्देमाल आढळून आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अहमद बेग याच्यावर अमरावती शहरातील विविध पोलीस ठाण्यांत चार गुन्हे आधीपासून नोंदवलेले आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सर्व नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे तसेच, कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ डायल ११२ या टोलफ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या