Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावजळगांव येथे चंद्रिका सॉ मिलला भीषण आग ; लाखोंचा ऐवज जळून खाक...

जळगांव येथे चंद्रिका सॉ मिलला भीषण आग ; लाखोंचा ऐवज जळून खाक !

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरात सकाळच्या 10 वाजेपासून पाऊस बरसत आहे. शहरातील बेंडाळे चौक ते नेरी नाका दरम्यान असलेल्या चंद्रिका सॉ मिल (वखार व दुकान) येथे गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली.
आगीची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. यामुळे वखारीतील लाखो रुपये किमतीचे लाकूड, दुकानातील साहित्य, फर्निचर आणि इतर वस्तू जळून खाक झाल्याचा प्राथांमेक अंदाज वर्तवला जात आहे. आगीच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती मिळताच, सुरुवातीला दोन अग्निशमन बंब आग विझवण्यासाठी दाखल झाले. आगीची भीषणता लक्षात घेता, आणखी बंब पाचारण करण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अथक प्रयत्न करत आहेत..बघ्यांची घटनास्थळी गर्दी झाली होती..

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या